Khed : मौजे वेरळ परिसरात गांजासह एका संशयिताला अटक

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत मौजे वेरळ परिसरात खेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीस गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई . मंगळवार दि. १८ रोजी पहाटे १.५५ वाजता करण्यात आली.

याबाबत पोलीस शिपाई विकास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गुन्हा नोंद करण्यात आली असून अमली पदार्थ नियंत्रण अधिनियम अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील खोपी येथे सध्या वास्तव्यास असलेला विनोद प्रसाद सुकर मेहता (वय ४०, मुळगावसुकर, तिलीर पदमा, जि. हजारीबाग, झारखंड) हा आपल्या सॅकमध्ये विक्रीसाठी गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिसरात गस्त वाढवून संशयिताची धरपकड करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिवळ्या प्लास्टिक पिशवीतून ५४६ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा आढळून आला. गांजा विक्रीसाठी साहित्यही आवश्यक आरोपीकडून जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपीकडे असलेली होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एव्ही ८६८४), किंमत अंदाजे ८० हजार, यासह एकूण ८८ हजार ६७३ इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास खेड पोलिसांतर्फे सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 20/Nov/2025