Khed : पोयनार येथील जंगलमय भागात आढळला मृतदेह

खेड : पोयनार येथील जंगलमय भागात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवार १८ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोयनार बौद्धवाडी येथील पाडूरंग तुळशीराम मोहिते हे घराला कुंपण घालण्यासाठी बांबू आणण्यासाठी कोंडीचा आडवा, दीपक गुणाजी घुमक यांच्या मालकीच्या जंगल भागात गेले असता त्यांना त्यांचे चुलत बंधू बाळाराम गणपत मोहिते (वय ५२) हे उताणे अवस्थेत मृत पडलेले दिसून आले. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

ही घटना सकाळी ९.१५ वाजण्यापूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 20/Nov/2025