Ratnagiri : शिवार आंबेरे येथील प्रथमेश कदमला आंतरराष्ट्रीय गेम्समध्ये सुवर्णपदक

पावस : शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्याने भुतान येथे संयुक्त भारतीय खेल फाऊंडेशनतर्फे (एसबीकेएफ) झालेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय गेम्समध्ये प्रथमेश कदम याने सुवर्णपदक जिंकून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाविद्यालयातील प्रथमेश राजेश कदमने पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ही अतुलनीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथमेश कदम याच्या या यशाने केवळ महाविद्यालयाचीच नाही, तर संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रथमेशचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 20/Nov/2025