Ratnagiri : पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून पावस परिसरात वाहनांची तपासणी

पावस : अतिरेक्यांच्या दहशतवादी कारवयांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहावे व धोका टाळता यावा, या पार्श्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून हद्दीतील समुद्रकिनारे व रस्ते धार्मिक स्थळे आधी ठिकाणी सागरी कवच अभियान राबविण्यात आले.

नाकाबंदीच्या माध्यमातून परिसरामध्ये अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. परिसरामध्ये कोणतेही अतिरेकी हल्ले किंवा अन्य गोष्टी होऊ नयेत, यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात आले. समुद्रकिनारी मार्गे येणाऱ्या अतिरेक्यांचा सामना कसा करायचा, किनारी भागातील स्फोटक पदार्थ आणले जातात. त्याचा शोध घेऊन विल्हेवाट कशी लावायची याबाबत प्रात्यक्षिक दिले जाते. यासंदर्भात पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रमसिंग पाटील म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून परिसरामध्ये जनजागृती होते व वाहनचालकाला आपण कोणत्याही अवैधरितीने वाहतूक केल्यास त्याची तपासणी होते याची जाणीव व्हावी. त्यातून परिसरामध्ये चांगला संदेश निर्माण व्हावा, या प्रमुख उद्देशाने अभियान राबवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 20/Nov/2025