Mandangad : शिरगाव मोटार अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथील चवदार हॉटेलसमोर मंगळवार (ता. १८) झालेल्या मोटार अपघात प्रकरणी चालक ओंकार प्रमोद लिमये (वय ३५, रा. केळशी) याच्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल रामसिंग पवार (वय ३७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १८ नोव्हेंबरला मोटार उलटून दोघेजण ठार झाले होते, तर एकजण जखमी झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडणगड पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 20/Nov/2025