रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७ या कार्यक्रमाअंतर्गत तरतुदींची माहिती ज्येष्ठ नागरिकांना मिळावी या उद्देशाने साक्षरता कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम सोमवारी (ता. १७) जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाला उपमुख्य लोकअभिरक्षक उन्मेश मुळये यांनी ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याची माहिती दिली.
सहायक लोकअभिरक्षक आयुधा देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तर जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी नालसा स्कीम फॉर सीनियर सिटिझन २०१६ ची माहिती दिली. या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 20/Nov/2025














