Khed Nagar Parishad Election : खेड नगराध्यक्षपद निवडणुकीत वंचितच्या सीमा शिंदे रिंगणात

खेड : खेड नगराध्यक्षपद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत दमदार प्रवेश केला आहे. पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सीमा शिंदे यांनी खेड नगरपालिकेतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सादिक काजी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नामनिर्देशनावेळी घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी आणि नागरिकांची उपस्थिती यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात नव्या पर्यायाबाबत मतदारांमध्येही सकारात्मक चर्चा सुरू असून या प्रवेशामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरली असली तरी मिळणारा पाहता जनसमर्थनाचा प्रतिसाद शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाचे संकेत उमटू लागले आहेत. आगामी निवडणुकीत हा नवा पर्याय खेडच्या राजकारणात किती प्रभावी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 20/Nov/2025