Infigo Eye Care Hospital : रत्नागिरी, लांजा, खेड येथे इन्फिगो आयकेयरतर्फे शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : साखरेवर नियंत्रण असले तरी डायबेटिक रेटिनोपथीकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टी धोक्यात येऊ शकते. लक्षणांशिवाय वाढणारी ही स्थिती अचानक दृष्टी कमी होण्याचे मोठे कारण ठरते. त्यामुळे डायबेटिस असलेल्या प्रत्येकाने नियमित डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने इन्फिगो आयकेयर हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी, लांजा आणि खेड येथे डायबेटिक रेटिनोपथीचे विशेष तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

चेन्नईचे सुप्रसिद्ध रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत अत्याधुनिक थ्री डी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डायबेटिसमुळे होणाऱ्या रेटिनातील बदलांची तपासणी करणार आहेत. डोळ्यांसमोर अधूनमधून काळे ठिपके दिसत असल्यास, डोळ्यांसमोर काजवे चमकल्यासारखा भास होत असल्यास, जाड भिंगाचा किंवा २.५ पेक्षा अधिक चष्मा असल्यास, पडद्याशी संबंधित कोणतीही समस्या व उपचार चालू असल्यास, डायबेटिस असल्यास, अचानक दृष्टी कमी झाल्यास तपासणी करावी, असे आवाहन केले आहे.

हे शिबिर २३, २४ आणि २६ नोव्हेंबरला साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी लांजा येथील थ्री डी आय क्लिनिक आणि २७ नोव्हेंबरला खेड येथील गुलमोहर पार्क येथील हॉस्पिटलमध्ये शिबिर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 20/Nov/2025