“रात्री-अपरात्री हाकेला धावणारा माणूस”; प्रभाग १४ मध्ये बंटी कीर आणि निवेदिता कळंबटे यांच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ!

➡️ रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १४ (Ward No 14) मध्ये शिवसेनेचे (महायुती) लोकप्रिय उमेदवार संतोष उर्फ बंटी कीर (Bunty Keer) आणि निवेदिता कळंबटे (Nivedita Kalambate) यांनी आज आपल्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ केला. किल्ला परिसरातील जागृत देवस्थान श्री भागेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून आणि ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन या विजय संकल्प मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

◼️जनसागराची साक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी किल्ला, मांडवी परिसरात कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक ग्रामस्थांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सुरुवातीपासूनच मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

◼️”बंटी कीर : आपल्या हक्काचा माणूस”
संतोष उर्फ बंटी कीर हे रत्नागिरीतील एक परिचित आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. माजी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी प्रभागात आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. केवळ निवडणुकीपुरते नाही, तर वर्षभर प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. स्थानिक नागरिक सांगतात की, “बंटी कीर हे आम्हाला नगरसेवक कमी आणि आमच्या घरातील सदस्य जास्त वाटतात. रात्री-अपरात्री कोणत्याही संकटात नागरिकांच्या एका हाकेला धावून जाणारा हा सच्चा कार्यकर्ता आहे.” त्यामुळेच प्रभागातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या तोंडी आज बंटी कीर यांचे नाव आहे.

◼️विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या माध्यमातून बंटी कीर यांनी प्रभाग १४ मध्ये आजवर अनेक महत्वपूर्ण विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्ते, पाणी, वीज आणि सुशोभीकरण यांसारख्या पायाभूत सुविधा त्यांनी प्रभागात पोहोचवल्या आहेत. केलेली विकासकामे आणि जनसामान्यांशी असलेली नाळ, याच्या जोरावर या निवडणुकीत बंटी कीर आणि निवेदिता कळंबटे यांना मतदारांचा प्रचंड आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:12 PM 20/Nov/2025