रत्नागिरी : महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी कार्यालयाकडून शहरात राबवण्यात आलेले मेनू-२६ वार्षिक प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले असून बुधवारी भगवती जेटी येथे या शिबिराचा समारोप करण्यात आला. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून रत्नागिरी, मंबई, पुणे, नागपूरमधून एकूण ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला-मुलींचा सहभाग होता. रणपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, जैतापूर, विजयदुर्ग व परत रत्नागिरी या मार्गे हा नॅशनल स्तरावरील मेनू-२६ कॅम्प पार पडला. शिबिराचे सूत्रधार कमांडर रामांजुल दीक्षित (समादेशक अधिकारी २ महा नेवल युनिट एनसीसी रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेनू २६ कॅम्प पार पडला.
‘स्वच्छ कोंकण, समृध्द कोंकण, सुंदर कोंकण’ याबाबत पथनाट्यातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटनी सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच रॅपलिंग, ट्रेकिंग, अॅडवेंचर, पथनाट्य तसेच अनेक विजयदुर्ग स्थळांना भेटी दिल्या. या कॅम्पमधून एनसीसी छात्रांना नौसेना, थलसेना, वायुसेना अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या. हा कॅम्प २ नौसेना अधिकारी, २ एनसीसी अधिकारी, ९ नौसेना स्टाफ, १ थलसेना स्टाफ व १ जेसीआय, ७ राज्य शासकिय कर्मचारी, ६० राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट विद्यार्थी यांनी यशस्वीरित्या पार पाडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 21-Nov-2025














