Pachal ST Stand | पाचल बसस्थानकाला स्वच्छता सर्वेक्षण मूल्यांकन समितीची भेट

पाचल : पाचल बसस्थानकाला एसटी स्वच्छता सर्वेक्षण मूल्यांकन समितीने भेट देऊन बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानक वाहतूक नियंत्रक राजेश कांबळे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. स्वच्छता सर्वेक्षण मूल्यांकन समितीने प्रवासी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी बसस्थानक स्वच्छतेसंबंधी चर्चा केली.

बसस्थानक स्वच्छता, रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे झुडुपे, नादुरुस्त गाड्या, रस्त्यावरील खड्डे, प्रवाशांची सुरक्षितता याबाबत प्रवाशांचे अभिप्राय व सूचना लिहून घेतल्या. स्वच्छतेसंबंधी सूचना व प्रवाशांचे अभिप्राय मूल्यांकन समिती वरिष्ठांना सादर करणार आहे. स्वच्छता सर्वेक्षण मूल्यांकन समितीने पाचल बस स्थानक व परिसरातील स्वच्छता कामाबद्दल वाहतूक नियंत्रक राजेश कांबळे यांचे अभिनंदन केले. या मूल्यांकन समितीमध्ये यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गीतांजली सूर्यवंशी यांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 21-Nov-2025