दापोली उर्दू शाळेतील चोरीचा २४ तासांत छडा

दापोली : दापोली शहरातील बसस्थानकापाठीमागे असलेल्या उर्दू शाळेत १९ नोव्हेंबरला चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये दापोली पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. शाळा उघडल्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील कपाट आणि इतर वस्तू विखुरलेल्या दिसून आल्या. चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तातडीने दापोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू झाली. अवघ्या २४ तासांत दापोली पोलिसांनी या चोरट्याला गजाआड करण्यात यश मिळवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 21-Nov-25