Ratnagiri : नाखरे ग्रामपंचायतीत मोफत महाआरोग्य शिबिर

पावस : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित भगवान महादेव सांबरे रुग्णालय रत्नागिरी आणि नाखरे शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नाखरे ग्रामपंचायतीत मोफत महाआरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिराच्या उद्घाटन व समारोपप्रसंगी जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, शिवसेना पावस विभागप्रमुख विजय चव्हाण, नाखरे सरपंच विद्या जाधव, उपसरपंच विजय चव्हाण, माजी सरपंच शुभदा नार्वेकर, नाखरे शिवसेना शाखाप्रमुख रामदास लांजेकर, संजय मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य शिवानी धुळप आदी उपस्थि होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 21-Nov-2025