मंडणगड : दापोली पंचायत समितीतील कृषी अधिकारी श्वेता शिंदे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी क्रांती माने यांनी तालुक्यातील वडवली येथील भावेश कारेकर यांच्या बांबू लागवडीच्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन कामाचे निरीक्षण केले. कारेकर यांनी शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करून बांबू लागवडीत उल्लेखनीय काम केले आहे.
अधिकाऱ्यांनी बांबू लागवडीच्या फायद्यांवर प्रकाश टाकत शेतकऱ्यांना मिळणारी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा, पर्यावरणाचे संरक्षण आणि विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तालुक्यातील मांदिवली गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना बांबू शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. बांबू लागवडीसाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्याच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 21-Nov-2025














