रत्नागिरी : बेकायदेशीरपणे बाळ दत्तक घेणे हा गुन्हा आहे. ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचे आहे, अशा सर्व दत्तक इच्छुक पालकांनी ची महिला व बाल विकास विभागामार्फत कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया करून बाळ दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी केले आहे.
दत्तक योजनेतून बाळ दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी केंद्र शासनाच्या https://missionvatsalya.wcd.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे. बाळ दत्तक घेण्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असेही पाटणकर यांनी सांगितले. शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत नोंव्हेंबर २०२५ राष्ट्रीय दत्तक जागरुकता महिना निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 21-Nov-2025














