रत्नागिरीत दोन दिवस आंतरराष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान परिषद

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद शुक्रवारी (ता.२१) आणि शनिवारी (ता. २२) पीएम- उषा योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेला देश विदेशातील विविध अभ्यासतज्ञ आणि संशोधक उपस्थितांना मार्गदर्शन करतील. परिषदेत विविध विषयांवर संशोधन निबंध सादरीकरण व चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

यामध्ये पर्यावरण व संवर्धन जीवशास्त्र, हवामान बदल व जैवविविधता, शाश्वत विकासासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्रातील नव्या प्रगती, अनुप्रयुक्त गणित व भविष्य तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञानासाठी मशीन इंटेलिजन्स, हरित रसायनशास्त्र व पर्यावरणीय शाश्वतता, प्रगत पदार्थविज्ञान व नॅनोसायन्स, आरोग्य व औषधातील रासायनिक प्रगती आणि पारंपरिक ज्ञान व वनौषधी या विषयांचा समावेश असून त्यावर सादरीकरण आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

या परिषदेमुळे वैज्ञानिक क्षेत्रात आंतरसंशोधन, तंत्रज्ञानातील सहकार्य आणि नवोन्मेषी कल्पनांची देवाणघेवाण वाढण्यास मदत होईल तसेच देश-विदेशातील संशोधकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 21-11-2025