Election 2025 : देवरुखात १० उमेदवारी अर्ज मागे

देवरूख : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमात अर्ज माघारीच्या अंतिमदिनी शुक्रवारी १० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे नगराध्यक्षपदासाठी ५ व नगरसेवकपदासाठी ६५ असे एकूण ७० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या दीक्षा खंडागळे यांनी आप या पक्षाकडून व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते.

यातील अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मृणाल शेट्ये (भाजपा), स्मिता लाड (अपक्ष), सबुरी थरवळ (उबाठा), वेदिका मोरे (अपक्ष) यांच्यात सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये अपक्ष उमेदवार इशिता कांगणे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे या प्रभागात ४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये संतोष केदारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने या प्रभागामध्ये ६ जणांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अर्ज मागे न घेतल्यामुळे ३ जणांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये उबाठा व शिंदे गट अशी दोन जणांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ३ उमेदवार समोरासमोर लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये माघार न घेतल्यामुळे ३ जणांमध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ७ देखील ३ उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये ६ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्ये ५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये सुरज रेडीज यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये ४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये ३ जणांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये अर्चना कदम या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागात ३ जणांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये ४ उमेदवार समोरासमोर लढत आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये एकही अर्ज मागे न घेतल्याने ४ जणांमध्ये लढत पाहायला मिळणार आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये वसंत तावडे (अपक्ष), सुभाष कोटकर (अपक्ष), मनोज तावडे (अपक्ष), अजय गजबार (अपक्ष) या ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागात ७ जणांमध्ये लढत होणार आहे. क्रमांक १७ मध्ये एकही अर्ज मागे न घेतल्याने २ उमेदवारांमध्ये या प्रभागात सरळ लढत पाहायला मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 22-Nov-2025