General Election : गुहागर नगरपंचायत निवडणुकीतून ११ जणांची माघार

गुहागर : गुहागर नगरपंचायतमध्ये शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. नगरसेवकपदासाठी १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, असे एकूण ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेकडून मयुरी मयूर मुकनाक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे भाजपा-सेना युतीकडून नीता विकास मालप, महाविकास आघाडीकडून पारीजात पराग कांबळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुजाता श्रीधर बागकर व अपक्ष म्हणून सुप्रिया वाघधरे अशी लढत होणार आहे. प्रभाग १ मधून योगिनी शैलेश शिरधनकर (अपक्ष), प्रभाग २ मधून सेनेकडून राकेश कमलाकर साखरकर, प्रभाग ५ मधून सिद्धी राजेश शेटे (अपक्ष), प्रभाग ७ भाजपाकडून विशाखा विकास जाधव, प्रभाग १० मधून भाजपाकडून नरेश रामदास पवार, प्रभाग ११ मधून भाजपाकडून मंगेश लक्ष्मण जोशी, प्रभाग १३ मधून राष्ट्रवादीकडून साहिल प्रदीप आरेकर व अपक्ष उमेदवार सौरभ राजेंद्र भागडे, प्रभाग १४ मधून अपक्ष उमेदवार रवींद्र सीताराम ठोंबरे व प्रभाग १५ मधून भाजपकडून प्रज्ञा प्रभाकर जांगळी असे एकूण १० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 22-Nov-2025