लांजा : लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगतदार होऊ लागला आहे. प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. निवडणूक यंत्रणेकडे दाखल झालेल्या एकूण ८७उमेदवारी अर्जापैकी ७४ वैध, तर १३ अर्ज अवैध ठरले होते. त्यामधून गुरुवार व शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुद्दतीत एकूण १२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून, ६२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ३, तर दुसऱ्या दिवशी ९ असे एकूण १२ अर्ज उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मुग्धा मनोज चांदोरकर, प्रभाग क्रमांक ३ स्मिता हरिश्चंद्र मांडवकर, प्रभाग क्रमांक ५ अशोक महादेव कातकर, प्रभाग क्रमांक ६- प्रमोद मनोहर कुरूप, प्रभाग क्रमांक ८- सुजित यशवंत भुरके, प्रभाग क्रमांक ८ मंगेश मनोहर लांजेकर, प्रभाग क्रमांक ९ सुहेल आदम मापारी, प्रभाग क्रमांक १३-फरजीन आदाम मापारी, प्रभाग क्रमांक १४ भालचंद्र तानाजी कांबळे, भाग क्रमांक १६- केशव गुणाजी गुरव, प्रभाग क्रमांक १७- मेघा महेश सुर्वे यांसह नगराध्यक्षपदासाठी अर्ज केलेल्या चेतना भालचंद्र कांबळे यांनी आपला अर्ज मागे घेतला. बारा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ६२ उमेदवार स्वतःला आजमावणार आहेत.
यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ५, तर नगरसेवक पदासाठी एकूण ५७ उमेदवार, असे एकूण ६२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांचा भरणा जास्त असल्याने अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु असताना दुसरीकडे अपक्षांचे राजकीय दावेदारांना जोर का झटका देऊन जोरदार आव्हान देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 22-Nov-2025










