रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्रात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मिलिंद अनंत खेडेकर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेडेकर हे मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे समुद्रात बुडालेल्या स्थितीत सापडले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 22-Nov-2025













