रत्नागिरी (Ratnagiri News Update): रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Nagarparishad Election) रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) यांनी आज प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचाराचा नारळ फोडत आपल्या अभियानाचा दणक्यात शुभारंभ केला. विशेष म्हणजे, सुर्वे यांनी आज थेट मांडवी (Mandvi) भागात धडक दिली असता, त्यांना नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मांडवीत जनसागराची उसळली गर्दी
निवडणूक प्रचारासाठी शिल्पा सुर्वे यांनी आज प्रभाग क्रमांक १४ मधील मांडवी परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचे स्वागत व्हावे, तसाच उत्साह आज सर्वसामान्य मतदारांमध्ये दिसून आला. सुर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाची तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत वाढलेली ‘क्रेझ’ पाहून ही निवडणूक विरोधकांसाठी सोपी नसणार, हे स्पष्ट झाले आहे.
बंटी कीर आणि निवेदिता कळंबतेंची तगडी तयारी
प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार बंटी कीर आणि निवेदिता कळंबटे यांनी प्रचाराची जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रभागात केलेले नियोजन आणि शिल्पा सुर्वे यांच्या लोकप्रियतेची जोड मिळाल्याने आजचा प्रचार शुभारंभ सोहळा अत्यंत गाजला. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळे या प्रभागात सुर्वे गटाचे पारडे जड मानले जात आहे.
शांत व संयमी नेतृत्व: विजयाचा हुकमी एक्का
शिल्पा सुर्वे यांची ओळख एक शांत, संयमी आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून आहे. केवळ आश्वासने न देता कामातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुर्वे यांना, नगरपालिका कामकाजाचा मागील दोन वर्षांचा गाढा अनुभव आहे. हा प्रशासकीय अनुभव आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा या निवडणुकीत (Ratnagiri Politics) त्यांच्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. आजच्या प्रचार शुभारंभाला मिळालेला प्रतिसाद पाहता, रत्नागिरीत पुन्हा एकदा शिल्पा सुर्वे यांच्या नेतृत्वाची लाट येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











