दापोली : तालुक्यातील मुरूड नवानगर परिसरात घरफोडी करून चोरट्याने ६ लाख ४० हजारांचे दागिने लंपास केले. चोरट्याने घराच्या छतावरील कौले सरकवून घरात प्रवेश केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ नोव्हेंबरला दुपारी १.३० ते १९ नोव्हेंबर सकाळी ६ या कालावधीत घडली. फिर्यादी निखत रमीज ऐनरकर (वय ३३) या चुलत सासू फरीदा यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी संशयित साहीम मुस्तफा ऐनरकर (रा. मुरूड) याने ही चोरी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. घराच्या छतावरील कौले बाजूला करून संशयिताने आत प्रवेश केला.
त्यानंतर लाकडी कपाटाचे बाहेरील कुलूप तसेच लॉकरचे लॉक धारदार हत्याराने तोडून आत ठेवलेले दागिने चोरून नेले. चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये ३५ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र (३.५० लाख), ८ ग्रॅम सोन्याची चेन (८० हजार), ५.५ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट (६० हजार), चुलत सासू फरीदा यांचा २५ ग्रॅम सोन्याचा हार (२.५० लाख) अशी ६ लाख ४० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 22-Nov-2025














