Ratnagiri : डी. जे. सामंत महाविद्यालयात आम्ही आणि शिक्षण यावर व्याख्यान

रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांतर्गत रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ रत्नागिरी व डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालय पाली यांच्या वतीने ‘आम्ही आणि शिक्षण’ या विषयावर गोवा येथील नामवंत साहित्यिक निवृत्त प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. प्रा. कुलकर्णी यांनी व्याख्यानात शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूलमंत्र आहे, विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी झाला पाहिजे, विद्यार्थ्यांनी गुण मिळवण्याच्या मागे न लागता ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण घेतले पाहिजे, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, प्रा. सुदीप पवार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:01 PM 22-Nov-2025