‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला दापोलीत अपेक्षित प्रतिसाद नाही

दापोली : दापोलीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत तीन वर्षांत २१ शेततळ्यांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी १८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

यात २०२२-२३ मध्ये फक्त एका शेततळ्याची मागणी झाली होती, जी मंजूर होऊन काम पूर्ण झाले. २०२३-२४ मध्ये ८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते; परंतु फक्त १७ शेततळ्यांची मागणी मंजूर झाली. २०२४-२५ मध्ये एकाही शेतकऱ्याने मागणी केली नाही. चालू वर्षात २३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी फक्त तीन शेततळे मंजूर झाली असून काम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:02 PM 22-Nov-2025