रत्नागिरी : मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातही शासनाने अँटी लैंड ग्रॅबिंग अॅक्ट (जमीन हडप विरोधी कायदा) तातडीने लागू करावा, या अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि मंदिर विश्वस्त या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड आणि दापोली येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, देवस्थानांच्या जमिनी संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मंदिरांच्या भूमी, देवराई यांच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला सांगा.
मंदिर विश्वस्तांच्या भावना आम्ही निश्चितपणे शासनापर्यंत पोहोचवू चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले की, आम्ही देवस्थानांच्या जमिनी आणि देवस्थानांच्या अन्य प्रश्नांबाबत गंभीर आहोत. याविषयाबरोबरच देवरहाटी बाबतही आम्ही सकारात्मकतेने काम सुरू केले आहे. त्याबाबतचा अभ्यास सुरू केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
हे निवेदन देताना रत्नागिरी येथे नाचणे येथील श्री नवलाई पावणाई जाकादेवी महापुरुष (खासगी) देवस्थानचे राजेंद्र सावंत, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजीवडाचेदेवेंद्र झापडेकर, श्री नवलाई पावणाई वाघजाई काळकाई मंदिर, केळ्येचे शशिकांत जाधव, श्री स्वयंभूधावजेश्वर मंदिर नाणीजचे राकेश सावंत, लांजा येथे श्री केदारलिंग देवस्थान, वेरवली बु.चे श्रीकृष्ण सरदेसाई, श्री पौलतेश्वर मंदिर, लांजाचे संतोष लिंगायत, श्री बसवेश्वर समाजमंदिरचे मोहन तोडकरी, राजापूर येथे श्री विमलेश्वर मंदिर,ओणीचे प्रकाश लिंगायत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चिपळूण येथे निवेदन देताना भगवान परशुराम देवस्थानचे शंकर कानडे, उभळे येथील श्री भैरी-चंडिका देवस्थानचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, कुटरे येथील श्री सुकाई-केदार देवस्थानचे अध्यक्ष विशाल परकर, कौंढर ताम्हाणे येथील श्री नवलाई देवस्थान समितीचे अध्यक्ष वसंत भोबस्कर, श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत खांडेकर, खेड येथे श्री शंकर-पार्वती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार राजारामराव भोसले, खोपी येथील जयसिंगराव भोसले, दापोली येथे श्रीराम मंदिर व श्री गजानन महाराज मंदिर पाजपंढरीचे विश्वस्त काशीनाथ पावसे, श्री महालक्ष्मी देवस्थान जालगावचे अध्यक्ष रमेश कडू, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुरेश शिंदे, परेश गुजराथी, विलास भुवड, उदय केळुस्कर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:00 PM 22-Nov-2025














