देवरुख : मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषेबाबत प्रत्येकाने आत्मियता बाळगून या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मराठी विषयाची चळवळ अखंडपणे सुरु ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप तांबे यांनी केले.
संगमेश्वर तालुका मराठी अध्यापक संघ आणि देवरुख पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक गटात अभिवाचन आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ डॉ. र. दि. गार्डी विद्यालय कळंबस्ते-वाडावेसराड येथे पार पडला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
अभिवाचन, निबंध स्पर्धेतील विजेते
प्राथमिक गट- अभिवाचन स्पर्धा :
तनुजा योगेश वाडकर (दादासाहेब सरफरे विद्यालय), अनुष्का सुरेश जोशी (देवरुख हायस्कूल), श्रावणी समित जाधव (कुंभारखाणी बु. हायस्कूल). निबंध लेखन: अस्मी अमृत मेंगाल (सोनवडे हायस्कूल), कार्तिकी योगेश सप्रे (बुरंबी हायस्कूल), संस्कृती सुहास पाष्टे (ताम्हाने हायस्कूल).
माध्यमिक गट – अभिवाचन स्पर्धा :
आर्या मिलिंद शहाणे (देवरुख हायस्कूल), अनन्या कुलदीप डोळस (बुरंबी हायस्कूल), कल्याणी सचिन साठे (माखजन हायस्कूल).
निबंध स्पर्धा : अमृता कातकर (तुळसणी हायस्कूल), क्रिशा कपिल इंदानी (पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर), सिमरन चंद्रकांत चांदिवडे (करजुवे हायस्कूल).
मुख्याध्यापक प्रमोद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष महेश चव्हाण, कोषाध्यक्ष प्रशांत सनगरे, उपसचिव विनोद ढोर्लेकर, संदीप नटे, उपाध्यक्ष मंगेश गुरव, प्रतिनिधी शीतल जाधव, सल्लागार संदीप बोथले, साक्षी नलावडे, तसेच प्रवीण बेडेकर, सुरेश कुंभार, प्रवीण खेडेकर, चंदना बांबाडे, कल्पना जाधव, सचिन साठे, नरेश ओकटे, स्नेहा सुर्वे उपस्थित होते. सचिव रघुनाथ फोंडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी अजित जाधव, नुरोद्दिन सौंदलगे, प्रियंका दळवी यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:46 PM 22-Nov-2025














