रत्नागिरी : जिल्हास्तरीय युवा महोत्सवात येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे केले जाते.
त्यानुसार राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडला.
या महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. ते असे – लोकनृत्य – ग्रुप प्रथम; लोकगीत – ग्रुप प्रथम; चित्रकला स्पर्धेत कु. प्राप्ती आलीम प्रथम; वक्तृत्व स्पर्धेत कु. सिद्धी शिंदे द्वितीय, कु. तन्वी सावंत तृतीय, विज्ञान प्रदर्शन प्रथम आणि तृतीय क्रमांक. विभागीय स्तरासाठी सांगली येथे स्पर्धा होणार असून त्यासाठी हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. बाबा सुतार, प्रा. शुभम पांचाळ, श्री. ओंकार बंडबे, श्री. गौरव बंडबे, गौरी साबळे, रोहित शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 24-11-2025












