संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे नायशी फाटा येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेश काणेकर (वय २२, रा. शिवखुर्द, सुतारवाडी, ता. चिपळूण) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
प्रथमेश काणेकर हा शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होता. तो सावर्डे हद्दीतील नायशी फाटा येथे आला असता, त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकली. या धडकेत प्रथमेश गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेत त्याला मदतीचा हात दिला आणि रुग्णालयात दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 24/Nov/2025












