Khed : अलसुरेत बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरे जखमी

खेड : तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. १९ नोव्हेंबरला अलसुरे -शिरीषकरवाडी येथे शेतकरी नीलेश प्रकाश शिरीषकर यांच्या गुरांच्या गोठ्या घुसून बिबट्याने एक रेडकू ठार केले. याच ठिकाणी असलेल्या पाच अन्य जनावरांना आणि एका गायीवरही बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमा केल्या.

गेल्या काही दिवसांपासून अलसुरे गावात हा बिबट्या सातत्याने दिसत असून, त्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने एका वासरावर हल्ला केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 24/Nov/2025