Khed : लोटे माळवाडी येथे विनापरवाना विदेशी दारूसह एकास अटक

खेड : लोटे माळवाडी येथे विनापरवाना गोवा बनावटीची विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीला खेड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आली.

फिर्यादी पोलिस कर्मचारी अशोक मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निहार उर्फ बाळू हेमंत वारणकर (वय ३८, रा. लोटे माळवाडी) हा आपल्या घरामागील कठड्याच्या आडोशाला दारू लपवून ठेवून विक्रीसाठी साठवणीमध्ये ठेवलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून गोल्डन ऐस ब्ल्यू व्हिस्कीच्या ८ बाटल्या व गोल्ड अँड ब्लॅक रमच्या १० बाटल्या असा एकूण ५९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 24/Nov/2025