रत्नागिरीच्या राजकारणातील ‘यंग आयकॉन’! प्रभाग २ मध्ये निमेश नायर यांच्या कामाचा डंका; रत्नागिरीच्या पाणी आणि कचरा प्रश्नावर काढला कायमचा तोडगा

◼️चर्चा तर होणारच! ५ वर्षांत करून दाखवलं; निमेश नायर यांच्या पाठीशी जनता खंबीर

➡️ रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, शहरात सध्या काही मोजक्याच उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून स्वतःला सिद्ध करणारे नेतृत्व म्हणून प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक पदाचे उमेदवार निमेश नायर यांचे नाव आघाडीवर आहे. एक तरुण, तडफदार आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून निमेश नायर यांनी गेल्या ५ वर्षात केलेली विकासकामे आजही मतदारांच्या स्मरणात असून, त्यांना मिळणारा वाढता जनप्रतिसाद विरोधकांची झोप उडवणारा ठरला आहे.

◼️पाणीपुरवठ्यात ऐतिहासिक कामगिरी
रत्नागिरी शहराला भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न असो किंवा आरोग्याच्या समस्या, निमेश नायर यांनी प्रत्येक जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. विशेषतः पाणीपुरवठा सभापती असताना त्यांची कारकीर्द अत्यंत गाजली. शहराला होणारा पाणीपुरवठा हा केवळ नियमित असून चालत नाही, तर तो स्वच्छ आणि आरोग्यदायी असावा, यावर नायर यांनी भर दिला. त्यांच्याच कार्यकाळात रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच साळवी स्टॉप येथील पाण्याच्या मुख्य साठवण टाक्यांची पूर्ण सफाई करण्यात आली. अनेक वर्षांपासून या टाक्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. मात्र, निमेश नायर यांनी पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावले आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित केला. शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजनबद्ध आराखडे तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

◼️कचरा प्रश्नावर ‘हायटेक’ उपाय
केवळ पाणीच नव्हे, तर आरोग्य सभापती म्हणूनही निमेश नायर यांनी आपली छाप पाडली आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न नेहमीच डोकेदुखीचा ठरला होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नायर यांनी ‘कचऱ्यापासून खतनिर्मिती’ प्रकल्पाचा प्रस्ताव केवळ मांडला नाही, तर त्याचा सतत पाठपुरावा करून तो मंजूर करून घेतला. कचऱ्याची विल्हेवाट लावतानाच त्यातून खतनिर्मिती करणे, हा त्यांचा दृष्टीकोन शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

◼️प्रभाग २ मधून प्रचंड पाठिंबा
गेल्या ५ वर्षांत केलेले भरीव काम, मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि प्रश्नांची जाण यामुळे प्रभाग २ मधील नागरिक निमेश नायर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे. “केवळ बोलणारा नाही, तर काम करणारा नगरसेवक” अशी त्यांची ओळख निर्माण झाल्याने, या निवडणुकीतही जनता त्यांनाच पसंती देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 24-11-2025