Ratnagiri Gogate-Jogalekar College : गोगटे महाविद्यालयाची विजयदुर्ग, कनकादित्य मंदिराला क्षेत्रभेट

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याला तसेच कशेळी येथील कनकादित्य (सूर्य) मंदिर या सांस्कृतिक वारशाने समृद्ध स्थळांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.

पीएम उषा उपक्रमांतर्गत च्या महाविद्यालयात भूतकाळाचा शोध घेणेः ऐतिहासिक स्मारके आणि पुरातत्त्व मार्ग स्थळांचा शोध घेणे, कौशल्यवर्धित अभ्यासक्रम सुरू आहे त्याअंतर्गत ही भेट आयोजित केली. बीए आणि एमए मुळे इतिहास विषयाच्या ३१ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांनी भेट दिली. क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन किल्ल्यांची रचना, संरक्षण प्रणाली, सागरी मार्गावरील रणनीती तसेच प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य वैशिष्ट्यांचा व सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा होता.

या क्षेत्रभेटीदरम्यान पाऊलखुणा पर्यटन उपक्रम चालवणारे श्रीवल्लभ साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याचे सामरिक महत्त्व, शिवकालीन दुर्गरचना, किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना आणि संरक्षणपद्धती, समुद्राशी असलेली जोडणी तसेच ऐतिहासिक लढायांतील भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिर परिसराला भेट देऊन या सूर्यमंदिराचा इतिहास, स्थापत्यशैलीबाबत माहिती मिळवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 24/Nov/2025