◼️”विकासाचा ‘ग्रीन’ पॅटर्न! निमेश नायर-स्मितल पावसकरांनी प्रभाग २ ला दिले निसर्गरम्य गिफ्ट”
➡️ रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांची चर्चा जोर धरू लागली आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून आपला प्रभाग कसा सुसज्ज करता येतो, याचे उत्तम उदाहरण प्रभाग क्रमांक २ मध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागातील लिमये गार्डन (Limaye Garden) शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरत असून, हे गार्डन सध्या रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरले आहे.
◼️निमेश नायर आणि स्मितल पावसकर यांची संकल्पना
प्रभाग २ चे कार्यतत्पर नगरसेवक निमेश नायर आणि नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे भव्य गार्डन साकारले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि मुलांना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांना हक्काचे विरंगुळा केंद्र असावे, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली. त्यांच्या या धडपडीचे आता फळ मिळाले असून, एक नयनरम्य प्रकल्प उभा राहिला आहे.
गार्डनची वैशिष्ट्ये आणि सुविधा : लिमये गार्डन हे केवळ झाडाझुडपांचे ठिकाण नसून ते एक वेल-प्लॅन्ड (Well-planned) प्रोजेक्ट आहे.
भव्य वॉकिंग ट्रॅक : आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी येथे प्रशस्त ट्रॅक बनवण्यात आला आहे.
मुलांसाठी खास सोय : लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळणी बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे सायंकाळी येथे मुलांचा किलबिलाट पाहायला मिळतो.
निसर्ग सौंदर्य : हिरवाईने नटलेले हे गार्डन मनाला शांती देणारे ठरत आहे.
सध्या पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने या गार्डनचा लाभ घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी तर तरुण मंडळी व्यायामासाठी या ठिकाणाला पसंती देत आहेत.
◼️विकासकामांच्या जोरावर ‘महायुती’चे पारडे जड
सध्या सुरू असलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीत निमेश नायर आणि स्मितल पावसकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, केवळ राजकीय भाषणे न करता ‘लिमये गार्डन’सारखे दृश्य स्वरूपातील काम उभे केल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. प्रभागात केलेल्या अशा ठोस विकासकामामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
9:04 AM 11/25/2025












