Ratnagiri : गावखडी येथील सुरुबनात बिअर पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : गावखडी समुद्र किनारी सुरुबनात विनापरवाना बिअर पिणाऱ्या विरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सूर्यकांत भैरू पाडावे (वय ३५, रा. शिवार आंबेरे) असे गुन्हा दाखल झालेल्या मद्यपीचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय शिवगण यांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्यानुसार ही कारवाई केली आहे. आरोपी सुरुबनातील स्मशानभुमीजवळ लंडन पिल्सनर बिअर पिताना आढळून आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 25/Nov/2025