Mandangad : सोवेलीत शिवीगाळ मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

मंडणगड : तालुक्यातील सोवेली येथे ग्रामस्थांमध्ये शिवीगाळ आणि मारहाणीची गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी सहाजणांविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ फेब्रुवारीला रात्री ११ वा. घडली.

१३ नोव्हेंबरला गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादी अशोक अनंत दळवी (७०, रा. सोवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, सुनील दळवी यांच्या अंगणात ग्रामस्थांसोबत बसले असताना विश्वनाथ पांडुरंग दळवी हा मद्यधुंद अवस्थेत संशयित एकनाथ दळवी, रवींद्र दळवी, प्रताप दळवी, नंदकुमार दळवी आणि अमेय दळवी यांना घेऊन आला. संशयितांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारहाण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 25/Nov/2025