ZP School : खेडमध्ये २१ धोकादायक वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत…

खेड : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. तब्बल २१ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी ३९ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे; मात्र या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतरही लालफितीत अडकले आहेत.

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या दयनीय अवस्थेमुळे पालकांची चिंता वाढली आहे. धोकादायक इमारतीत मुलांना जी पाठवणे कठीण होत असून, त्यामुळे पालक शहरातील शाळांकडे वळत आहेत. याचाच परिणाम म्हणून काही शाळांची पटसंख्या घटताना दिसत आहे.

खेड येथील शिक्षण विभागाकडून या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले; मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्याने शाळांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गडद होत असून, दुरुस्तीच्या कामांना तातडीने मंजुरी मिळावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 25/Nov/2025