TET EXAM : टीईटी विरोधी ५ डिसेंबरला शिक्षक संघटनेचा मोर्चा

चिपळूण : टीईटी विरोधात ५ डिसेंबरला राज्यभरात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीतर्फ महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ताकदीने सहभागी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांनी दिली.

ते म्हणाले की, सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे देशभरातील व राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग काढण्याऐवजी राज्य सरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.

देशातील उत्तर प्रदेश तामिळनाडू सरकारने टीईटी सक्ती निर्णय विरोधात कायदेशीर पाऊले उचलली असताना महाराष्ट्र सरकारलाच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी कोणती कायदेशीर अडचण आहे असा सवाल आहे. सरकारने टीईटी निर्णयाविरोधात ठोस भूमिका घ्यावी यासाठी राज्यभरातील शिक्षक ५ डिसेंबरला मोर्चा काढणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 25/Nov/2025