रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांवमधील विद्यार्थ्यांनी २१ नोव्हेंबरला ‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिन’ साजरा केला. या निमित्ताने जलजीविका या स्वयंसेवी संस्थेसोबत शिरगांव खाडी कांदळवनमध्ये जाऊन कांदळवनातील वृक्षांची आणि परिसंस्थेची माहिती घेतली. जलजीविकेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था समजावून सांगितली.
या कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश मिरजकर, रोहित बुरटे, मयुरी डोंगरे सुर्वे, सुशील कांबळे आणि श्री. भाटकर आणि जलजिविका पुणेचे चिन्मय दामले, पीयुषा शेलार यांनी यशस्वीरीत्या केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 25/Nov/2025











