Khed : विन्हेरे रेल्वेस्थानकावर तिकीट निरीक्षकांच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा प्रयत्न फसला

संगमेश्वर : ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस गाडीतील चोरीचा प्रकार कोकण रेल्वेचे महेश पेंडसे आणि आर. सी. मीना या तिकीट निरीक्षकांच्या प्रसंगावधानामुळे फसला. ही घटना खेडजवळील विन्हेरे रेल्वेस्थानकावर घडली. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबरला ओखा येथून निघून एर्नाकुलम गाडी विन्हेरे रेल्वेस्थानकादरम्यान थांबली असता रात्री एस १ आणि एस २ बोगीमध्ये चोरीचा प्रयत्न झाला.

त्या वेळी महेश पेंडसे आणि आर. सी. मीना यांनी प्रवाशांना वेळीच सावध करत रेल्वेचे दरवाजे व खिडक्या बंद करून सर्वांना सावध केले. त्यामुळे चोरट्यांना रेल्वेत चढता आले नाही. ते तिथून निघून गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 25/Nov/2025