Kirtan Mahotsav : आंबडसमध्ये ६ ते ८ डिसेंबर दरम्यान कीर्तन महोत्सव

खेड : तालुक्यातील आंबडस येथील श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्था अंतर्गत वारकरी शिक्षणसंस्थेच्यावतीने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. ६ रोजी आंबडस येथील दिनेश करंजकर यांचे प्रवचन, मुंबईतील अर्जुन सुंभे यांचे कीर्तन व आंबडस येथील महिला भजन मंडळाचा जागर होईल. ७ ला चिरणी येथील जनार्दन आंब्रे यांचे प्रवचन, मुंबईतील ज्ञानेश्वर सांगले यांचे कीर्तन व शेल्डी येथील स्वर विठाई भजन मंडळाचा जागर होईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बदललेल्या जीवनशैलीतून आलेल्या आजारांबद्दल मार्गदर्शन व जनजागृती केली जाईल.

करण भानत, प्रणित खांडेकर, आदित्य पडवेकर मार्गदर्शन करतील. ८ ला सकाळी १० ते १२ या वेळेत मुंबई येथील तुकाराम निकम यांचे काल्याचे कीर्तन होईल. हरिपाठ व कीर्तनासाठी गुरुमाऊली वारकरी शिक्षणसंस्था विद्यार्थी, सांप्रदाय मंडळ, गजमल पिंपळी, महिला व वारकरी मंडळ, आंबडस, युवा पंचक्रोशी वारकरी मंडळ, रत्नागिरी युवा वारकरी सांप्रदाय मंडळ सहभाग नोंदवणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राकेश मोरे यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 26/Nov/2025