रत्नागिरी : रत्नागिरी नगर पालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील दोन अपक्ष उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयासंदर्भात जिल्हा न्यायालयात काल सुनावणी झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्याचा निर्णय जिल्हा न्यायालयाने कायम ठेवत दोघांची याचिका फेटाळली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी याला दुजोरा दिला. रात्री उशिरापर्यंत न्यायालयाच्या निकालाची प्रत न मिळाल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
पालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांच्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दोन्ही उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 26/Nov/2025












