Chiplun : आमदार शेखर निकम यांच्या हस्ते असुर्डे रस्ता कामाचे भूमिपूजन

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुकाई देवी मंदिर रस्ता विकासकामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

सुमारे २ किमी लांबीच्या या दुर्गम रस्त्याचे काम लवकरच होणार असल्याचे यावेळी आ. निकम यांनी सांगितले. या कामासाठी विविध विकास निधीतून ६० लक्ष रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. आराध्य दैवत गावदेवी सुकाई माता मंदिरात कमलाकर गावकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून केली.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, कोकरे जि. प. गट अध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुधीर राजे, कोकरे पं. स. गण अध्यक्ष नागेश साळवी, उपाध्यक्ष नीलेश खापरे, सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव, निर्मळवाडी ग्रामस्थ अनंत निर्मळ, यशवंत निर्मळ, राजाराम निर्मळ, महादेव चोगले, प्रभाकर चोगले, गंगाराम चोगले, तानाजी चोगले, शिवाजी चोगले, समीर चोगले, अजित खापरे, शैलेश खापरे, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष चोगले, सचिव सूर्यकांत निर्मळ आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 26/Nov/2025