Mandangad : नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

मंडणगड : चुलत बहिणीच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या तरुणाशी वाद घालून त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी रात्री बाणकोट येथे घडली. यामध्ये दीपक रामचंद्र साळुंखे (वय ३०, रा. देव्हारे, मंडणगड) हा जखमी झाला असून, त्याने याबाबत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रोहिदास तुळशीराम पवार (वय ५०), अक्षय रोहिदास पवार (वय २५), पप्पू तुळशीराम पवार (वय ३०) आणि अरुणा रोहिदास पवार (वय ४०, सर्व रा. पालगड, दापोली) यांच्यावर बाणकोट पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 26/Nov/2025