रत्नागिरी : निवेबुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने मानसिक आजाराला कंटाळून झोपेच्या गोळ्यांचा डोस, गवत मारण्याचे औषध व फिनेल प्राशन केले. उपचारासाठी त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लखन वसंत सुर्वे (३०, रा. निवेबुद्रुक) असे गवत मारण्याचे औषध, फिनेल आणि झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. सुमारास निवेबुद्रुक येथे घडली. लखन हा गेली चार वर्षे मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर देवरुख येथे उपचार सुरू होते. बुधवारी घरी असताना सकाळी मानसिक तणावात येऊन त्याने झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतला, गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले, तसेच फिनेल ही प्राशन केले.
ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या बाबत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 27/Nov/2025














