General Election | रत्नागिरीत २८ अपक्ष उमेदवार रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी २५ असे २८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अनेक अपक्ष नगरसेवकांनी झाडू, नारळ या निशाणींना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवार असून तीन उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत. यामध्ये शिल्पा सुर्वे धनुष्यबाण, शिवानी राजेश सावंत माने या मशाल तर वाहिदा बशीर मुतुर्झा या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेतर तर तीन उमेदवार या अपक्ष आहेत. या अपक्ष उमेदवारांमध्ये प्राजक्ता किणे सीसीटीव्ही कॅमेरा, संध्या कोसुंबकर फलंदाज तर अॅड. सुश्मिता शिंदे या झाडू निशाणीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

रत्नागिरीत एकूण १६ प्रभाग असून प्रभाग १ अमध्ये अपक्ष उमेदवार रुक्साना प्रभुलकर यांनी झाडू निशाणी तर व मध्ये रमीझ झारी यांनी झाडू, अनिकेत वालम नारळ तर मिलींद साळवी यांची शिटी ही निशाणी आहे. प्र. २ अ मध्ये अपक्ष उमेदवार सोनाली केसरकर व ब मधील योगेश हळदवणेकर यांची निशाणी बॅट आहे.

प्र. ३ ब मध्ये मतीन बावानी यांची निशाणी नारळ आहे. प्र. ४ अ मध्ये सायमा काझी यांची निशाणी नारळ, नफिसा मजगावकर यांची झाडू तर व मध्ये इम्रान नेवरेकर यांची निशाणी ऑटो रिक्षा तर राहिल मुकादम यांची एअर कंडिशनर ही निशाणी आहे. प्र. ५ ब मध्ये सरिता कदम यांची निशाणी नारळ आहे. प्र. ७ अ नीलेश आखाडे यांची निशाणी नारळ आहे. ८ अ मध्ये स्नेहा ठिक यांची बॅट, ब मध्ये शाहीद वस्ता यांची निशाणी छत्री आहे.

नगर परिषदेचा प्रभाग ९ ब मध्ये संध्या कोसुंबकर यांना घड्याळ तर अॅड. तमन्ना झारी यांना झाडू प्र. ११ अमध्ये तुषार कांबळे यांना नारळ, १२ अ मध्ये मैथिली मयेकर यांची निशाणी होडी आहे तर ब मध्ये सचिन तळेकर यांची निशाणी नारळ आहे. १३ ब मध्ये प्रसाद भुते यांना नारळ ही निशाणी मिळाली आहे. १४ ब मध्ये आशिष मोरे यांना नारळ, १५ ब मध्ये संकेत चवंडे यांना नारळ तर १६ अ मध्ये रेहाना वस्ता यांना झाडू तर ब मध्ये खलील वस्ता यांना झाडू ही निशाणी मिळाली आहे. त्यामुळे काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी, चौरंगी व पंचरंगी निवडणूक रंगणार आहे. शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि बसपा हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 27/Nov/2025