संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या सर्वांनी आत्मसात करायला हव्यात. याची माहिती नव्या पिढीला विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थिनींना व्हायला हवी. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत आणि संविधान उद्देशिकेची प्रतिमा दिली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी या उद्देशिकेचे वाचन केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, वरिष्ठ सहाय्यक यू. एम. आष्टुरे, तालुका समन्वयक अमोल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रितेश सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 27-11-2025