रत्नागिरी : राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ही परीक्षा आता दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पुढील वर्षी दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केली होती.
मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रविष्ठित झालेले आहेत. त्यामुळे याच तारखेल राज्यात होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती. शिक्षकांना सीटीईटी परीक्षा देत यावी, याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 27/Nov/2025












