मंडणगड : तालुक्यातील एकूण २२ विकास संस्थांपैकी सर्व २२ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून, न या उपक्रमात मंडणगड तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यातील २० विकास संस्थांचा शेतकरी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते ई-पॅक्स प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
सहकार सप्ताहानिमित्त रत्नागिरी हा जिल्हा मध्यवर्ती बँक, तालुका शाखा, तमंडणगड यांच्यावतीने आयोजित सहकार मेळावा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवारी (ता. २५) तालुका कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, सहायक सरव्यवस्थापक उदय कदम, व्यवस्थापक पी. एम. मोहिते, व्यवस्थापक भाऊसाहेब पाडलेकर, मंडणगड तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष विजय ऐनेकर, अनंत पारधी, सागर भोगल, मंगेश पवार, किरण तांबे, चंद्रकांत करजांवकर, नानू खैरे, दिक्षा मोरे, अनिल गायकवाड, नरेश पातेरे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी तालुक्यातील सहकारी संस्थांनी घेतलेली आधुनिक वाटचाल, पारदर्शक कामकाजासाठी डिजिटल प्रणालीचे महत्त्व आणि सहकाराच्या बळावर ग्रामीण विकासाला गती मिळत असल्याचे प्रतिपादन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 27/Nov/2025














