Vilas Patne | अॅड. विलास पाटणे यांनी घेतली उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट

रत्नागिरी : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी दिल्लीत जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरफोजीराजे यांच्यावरील प्रस्तावित पुस्तक त्यांना भेट दिले.

दिल्ली येथील भेटीमध्ये अॅड. पाटणे यांनी प्रस्तावित पुस्तकावर चर्चा केली तेव्हा उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी अॅड. पाटणे यांचे कौतुक केले. सरफोजीराजे हे मुळचे मराठी राजे असले, तरीही तामिळ संस्कृती आणि मराठी संस्कृतीच्या प्रगतीकरिता खूप प्रयत्न केले आहेत. प्रस्तावित पुस्तकातून मराठी आणि तामिळचे बंध घट्ट करण्याकरिता अधिक प्रयत्न होणार आहेत. दोन्ही संस्कृती एकत्र आणण्याचे काम हे पुस्तक करेल, असे त्यांनी पाटणे यांना सांगितले. तामिळनाडूतील एका मराठी राजाची दखल महाराष्ट्रातील एका व्यक्तीने घेतली याचे कौतुकच आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 27/Nov/2025