खेड : तालुक्यातील भडगाव येथील रा. धो. पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर प्रशालेमध्ये वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन जे. सी. आय. २०२६ चे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी अमित नामुष्टे व सेक्रेटरी व प्रशालेचे माजी विद्यार्थी मधुर पेठे यांच्याहस्ते झाले. स्वागत माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री. भोसले, तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्ञा मोरे व अंजली जाधव यांनी केले.
या क्रीडा स्पर्धेत २० मी. धावणे, लंगडी, बटाटा शर्यत, अडथळा शर्यत, चमचा लिंबू, बेडूक उड्या असे वेगवेगळे क्रीडा प्रकार यावेळी घेण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वितेकरिता स्पर्धा प्रमुख प्रज्ञा मोरे, विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, राजेंद्र नाटेकर, अंजली जाधव, रुपाली भिसे, सुनयना सावंत, राधा भालेकर, अश्विनी दांडेकर, नेहा सुर्वे यांच सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 27/Nov/2025














